जम्मूमध्ये तिसर्‍यांदा दिसले ड्रोन !

गेले तीन दिवस सलग ड्रोनद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?

ड्रोन (प्रतिकात्मक छायाचित्र)

जम्मू – गेल्या ४८ घंट्यांमध्ये जम्मूमध्ये तिसर्‍यांदा ड्रोन दिसल्याची घटना घडली आहे. जम्मूमधील कुंजवानी-रत्नूचक भागात हे ड्रोन दिसले. यापूर्वी भारतीय वायूदलाच्या तळावर जिहादी आतंकवाद्यांनी ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणले, तर त्याच्या दुसर्‍या दिवशी येथील सैन्यदलाच्या तळावर दिसलेले ड्रोन सैनिकांनी गोळीबार करून पळवून लावले होते. या ड्रोन आक्रमणांच्या अन्वेषणाचे दायित्व राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) देण्यात आले आहे.

कालूचक येथे ड्रोन आढळल्यानंतर कुंजवानी, पुरमंडळ मोड, बाडी ब्राह्मणा, रत्नूचक आणि राष्ट्रीय महामार्ग येथे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि भारतीय सैन्य यांच्या संयुक्त पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे.