कळवा येथे वृक्ष उन्‍मळून पडल्‍याने २ जण घायाळ !

या घटनेमुळे शहरातील वृक्षांचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. घायाळांना उपचारांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

कोकणात कायमस्वरूपी ‘आपत्ती प्रतिसाद दल’ उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !

आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्यात येतील’, अशी घोषणा केली आहे.

सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक चालू 

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्ग : महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने २५ गावे अंधारात !

येथे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली.

जलमय परिस्थितीमुळे कल्याण येथील १ सहस्र कुटुंबांचे स्थलांतर !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरितांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.

गोवा : भारतीय तटरक्षक दलाचे संशोधन नौकेवर यशस्वी बचावकार्य : ३६ जणांचे प्राण वाचवले

प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे.

गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !