जळलेल्या वनक्षेत्रात भूरूपांतर कदापि नाही ! – वनमंत्री विश्वजीत राणे

डोंगरमाथ्यावर आग लागल्यास ती विझवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ? आगीची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का ? आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली भूमी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जाऊ नये, यासाठी कोणती काळजी घेणार आहात ?

धरणाला कोणताही धोका नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर

या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ द.ल.घ.मी. इतका आहे. वर्ष १९८३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ द.ल.घ.मी. आहे. सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गोवा : नूतनीकरण केलेल्या सप्तकोटीश्वर मंदिराच्या छताला गळती

पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मंदिराला भेट देऊन छतावरून होणार्‍या पाण्याच्या गळतीसह पाण्याचा निचरा होण्यात येणार्‍या अडचणी, परिसरात पाण्यामुळे झालेली निसरड आदींची पहाणी केली.

गोवा : करंझोळला रेल्वेमार्गावर दरड कोसळली 

संततधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, तसेच जमीन फुगल्याने, दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.

राधानगरी धरणाची ४ द्वारे उघडल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी ४५ फूट पाणीपातळी गाठण्‍याची शक्‍यता ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर

धरणक्षेत्रात सातत्‍याने पाऊस चालू असल्‍याने राधानगरी धरण पूर्णपणे भरल्‍याने त्‍याची ४ स्‍वयंचलीत द्वारे उघडल्‍यात आली आहेत.

कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट

२७ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

भीषण उष्णतेमुळे ग्रीसच्या जंगलात लागलेली आग विझवतांना विमान दुघर्टनाग्रस्त !

भीषण उष्णतेमुळे अनेक दशकांचा विक्रम मोडणार्‍या युरोपीय देश ग्रीसची दैनावस्था झाली आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.

पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !

दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.