पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील दंगलीचे प्रकरण

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक झाली होती. काही हिंदूंच्या घरांत घुसून तोडफोडही करण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक हिंदूंकडून केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात पोलिसांना एक महिला जाब विचारत असून पोलीस मौन बाळगून असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये ही हिंदु महिला पोलिसांना म्हणत आहे, ‘कृपा करून आम्हाला न्याय द्या. घरात घुसून विध्वंस केला आहे. याला उत्तरदायी कोण ? आत येऊन बघा. आम्हाला जगता येणार नाही. आम्ही जगायचे नाही का ? हिंदूंनी इथे रहायचे नाही, तर कुठे जायचे ? सर्वांनी मरायचे का ? पोलिसांना हाक दिली, तर ते दूर जाऊन थांबले आहेत. त्यांनी आम्हाला मारले, याचे कारण काय ? आमच्या रक्षणासाठी आहात ना ? हिंदूंचे रक्षण करत नाही; मात्र मुसलमानांना रक्षण देता. आमच्या घरात येऊन बघा. असे झाले (विध्वंस झाला), तर महिला राहू शकतील का ? आम्ही कसे जगायचे ? आमच्यात शूर पोलीस कुणीच नाही का ?’

संपादकीय भूमिका 

कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !