चोरीच्या प्रकरणी हिंदु तरुणांवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांना अटक

बॅटरी चोरीच्या प्रकरणी तिघा हिंदु तरुणांना मारहाण करून संपूर्ण गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद शेरू आलम, महंमद जिन्नत, महंमद तेजू, महंमद नासिर, महंमद अख्तर आणि अमरजीत सिंह यांना अटक केली आहे.

माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला, तर देशात आपोआप कोरोना नियंत्रणात येणार आहे. तुमच्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणार्‍या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा.

विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या वतीने शिरगुप्पी गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या औषधाचे वाटप 

विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकटात गरजूंना घरपोच भोजन, भाजीपाला पोच करणे यांसह अग्निहोत्र, यज्ञ या माध्यमातून स्वामीजी नागरिकांना साहाय्य करत आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळाचे मुंबईत सर्वत्र थैमान !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

खानमोह भागात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाने २ आतंकवादी ठार केले. त्यांच्याकडून २ पिस्तूल, १ हँड ग्रेनेड आणि ३ यू.बी.जी.एल्. (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) जप्त करण्यात आले.

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

पोलिसांनी नियम मोडणार्‍या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.

DRDO चे कोरोनावरील औषध ‘२ डीजी’ हे रुग्णांना वापरण्यासाठी उपलब्ध !

हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.

पँगाँग तलावाजवळील चीनच्या सैन्यतळाचे आधुनिकीकरण आणि सैनिकांची जमवाजमव  

चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .

गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

चीनकडे लिक्विड ऑक्सिजन नसल्याने त्यासाठी नेपाळची भारताकडे मागणी !

चीनच्या भरवश्यावर भारताला डोळे वटारून दाखवणार्‍या नेपाळला त्याच्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटी भारताकडेच हात पसरवावे लागत आहेत,