गंगा नदीतून वाहून येणार्‍या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !

उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.

अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्‍यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?

कोरोनामुक्त झालेल्यांना ३ मासांनंतर लस देण्यात यावी ! – केंद्र सरकारच्या पॅनलचा सल्ला

‘अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’ या केंद्र सरकारच्या पॅनेलने कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना ९ मासांनंतर कोरोनाची लस देण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या लसीच्या २ डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला याच पॅनलने दिला होता.

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणात ‘मुलीच्या कुटुंबियांपासून संरक्षण मिळावे’, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

राजस्थानमधील संवित् सोमगिरी महाराज यांचा देहत्याग !

बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.

केजरीवाल देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत देशाचे मत नाही ! – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सिंगापूरकडे स्पष्टीकरण

अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत हे देशाचे मत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सिंगापूरला स्पष्ट केले.

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट

‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ यानुसार ‘आधीच काँग्रेसवाला त्यात धर्मांध’, असे असल्यावर हिंदु धर्माचा अवमानच करणारच ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

उत्तरप्रदेशच्या गावांतील आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यातील गावांमध्ये आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ चालली आहे. वेळ असतांना यात पालट न करणे, याचा अर्थ आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रित करण्यासारखे आहे, अशा शब्दांत एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला कोरोनावरून फटकारले आहे.

अटकेनंतर बंगालचे २ मंत्री आणि १ आमदार प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात !

राजकारण्यांना अटक केल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती बिघडते, हे नेहमीचेच झाले असून या आजारावरही आता प्रभावी ‘लस’ काढण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !