पँगाँग तलावाजवळील चीनच्या सैन्यतळाचे आधुनिकीकरण आणि सैनिकांची जमवाजमव  

चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !

बीजिंग (चीन) – चीनने लडाखमधील पँगाँग तलावाजवळील फिंगर ४ ते ८ पर्यंतचे त्याचे सैन्य मागे घेतले असले, तरी येथील सैन्यतळ रुटोगमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि सैन्याची जमवाजमव केल्याचे उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रावरून समोर आले आहे. तसेच चीन या सैन्यतळाचे आधुनिकीकरण करत असल्याचे दिसून आले आहे.

‘द इंटेलिजन्स’ने ११ मे या दिवशी घेतलेल्या छायाचित्रानुसार चीनने रुटोगमध्ये युद्ध वाहने, शस्त्रसाठा, थंड वातावरणात सैनिकांना पुरेशी उष्णता मिळावी यासाठी तंबू उभारण्यात आले आहेत. चीनने याठिकाणी मोठा शस्त्रसाठा लपवून ठेवला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

याच वेळी चीन अक्साई चीनमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. चीन या ठिकाणी नवीन हेलिपॅड, बराक बनवत असल्याचेही उपग्रहातून काढलेल्या छायाचित्रातून समोर आले आहे.