लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आढळली कोरोनाची सौम्य लक्षणे ! – ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालातील माहिती

लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली, अशी माहिती ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालात देण्यात आली आहे.

निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच अन्य नागरिकांवर वचक बसत नाही आणि तेही त्याचे उल्लंघन करतात, त्यामुळे या प्रकारांना पोलीस आणि प्रशासनच अधिक उत्तरदायी आहेत !

बेंगळुरू येथील दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन

पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट करण्यास उशीर केल्याने जामीन  !

गुजरातच्या साबरमती नदीमध्ये आढळले कोरोनाचे विषाणू !

कर्णावती (गुजरात) येथील साबरमती नदीसह कांगरिया आणि चांदोला तलावांतील पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळले.

तबलिगी जमात प्रकरणी ३ वृत्तवाहिन्यांना दंड आणि प्रेक्षकांची क्षमा मागण्याचे ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी’चे निर्देश

तबलिगी जमातविषयी करण्यात आलेले वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते.

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र शौर्यजागृती शिबिरा’ मध्ये विविध जिल्ह्यांतील ६३५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १७ जून या दिवशी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली. त्यानंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत मुसलमान बहुसंख्यांक होतील !

या दशकात हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा वेग दुप्पट होता.

भारतातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ३० लाख कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता ! – बँक ऑफ अमेरिका

‘नॅसकॉम’च्या मते देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास १ कोटी ६० लाख लोक काम करतात.

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा २० जुलैला, तर १२ वीचा ३१ जुलैला निकाल !

बोर्डाने १७ जून या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०:३०:३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये ३ प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.