नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन करू देणार नाही ! – महापौर किशोरी पेडणेकर

नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याने श्री गणेशाच्या मूर्तीत पूजनामुळे निर्माण झालेली पवित्रके सर्वदूर पसरतात आणि पर्यावरणासह अखिल मानवजातीला त्याचा लाभ होतो, असे शास्त्र आहे !

१ कोटी ७९ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राचा देशात विक्रम !

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी, तसेच त्या लाटेची दाहकता न्यून करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ८ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत १४ लाख ३९ सहस्र ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

एकनाथ खडसे यांनी पुणे येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते ! – ‘ईडी’च्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्राथमिकदृष्ट्या पहाता भोसरी (जिल्हा पुणे) येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे’, असे निरीक्षण अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) ९ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात नोंदवले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल !

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 

‘अँटिलिया’ प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिली ! – सायबर तज्ञाचा आरोप

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद !

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र ‘लूकआऊट’ नोटीस

पुन्हा नोटीस काढूनही उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने परमबीर सिंह यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.