मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे कारखान्यामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या प्रकरणाची कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडीला) सादर केली. हसन मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी शेल आस्थापनाच्या मार्फत हा घोटाळा केला आहे. ब्रिक्स इंडिया आस्थापनाला हा कारखाना चालवायला दिला होता. या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
ज्यांनी मला ही कागदपत्रे दिली आहेत, त्यांना मी कोणत्याही परिस्थितीत वाचवणार आहे; मात्र मला ही कागदपत्रे रामदास कदम यांनी दिलेली नाहीत. घोटाळ्याच्या संबंधातील कागदपत्रे आपल्याला कुठून मिळाली, याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी करावी, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.