पोलिसांत गुन्हा नोंद !
श्योपूर (मध्यप्रदेश) – येथील काँग्रेसचे आमदार बाबू मीना जंडेल यांनी भगवान शंकराला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेने पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर जंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा ११ सेकंदाचा व्हिडिओ आहे. आमदार बाबू जंडेल यांनी हा व्हिडिओ जुना असून त्यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यात फेरफार करून तो प्रसारित करण्यात आल्याचे म्हटले आहे. ‘मी असे कधीच बोलू शकत नाही’, असा दावाही त्यांनी केला. काँग्रेसने दावा केला आहे की, हा व्हिडिओ ५ वर्षे जुना आहे. (व्हिडिओ कितीही जुना असला, तरी त्यात जे काही म्हटले आहे, ते अयोग्य असेल, तर संबंधिताला शिक्षा झालीच पाहिजे ! – संपादक)
A video of #Congress MLA Babu Jandel from Madhya Pradesh abusing Mahadev (Shiv) goes viral. Police register a case.
👉 The Police should immediately put Jandel behind bars. Had Jandel accused other religions, there would have been a fatwa of Sar Tan Se Juda against him by now.… pic.twitter.com/5QA9sh4aYk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 18, 2024
भाजपच्या इंदूर येथील कार्यकर्त्यांनी जंडेल यांचा पुतळा जाळला. बाबू जांडेल यांच्या तोंडाला काळे फासल्याचीही चर्चा आहे. उज्जैनमधील श्री महाकाल मंदिराचे पुजारी महेश शर्मा यांनीही जंडेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे मध्यप्रदेश राज्याचे अध्यक्ष आणि खजुराहोचे खासदार व्ही.डी. शर्मा म्हणाले की, मला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारायचे आहे की, हे काँग्रेसचे प्रेमाचे दुकान आहे कि शिवीगाळ करण्याचे दुकान आहे ? काँग्रेस याप्रकरणी काय कारवाई करणार आहे ?
संपादकीय भूमिकापोलिसांनी तात्काळ जंडेल यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! जंडेल यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे (शिरच्छेदाचे) फतवे निघाले असते ! |