‘Jersey Animals’ Outside Temples : मुंबईत मंदिरांबाहेर गोग्रासासाठी देशी गायींऐवजी ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल !

मंदिराच्‍या बाहेर गोमातेच्‍या नावाखाली बांधण्‍यात आलेले ‘जर्सी प्राणी’

मुंबई, १८ ऑक्‍टोबर (वार्ता.) – महाराष्‍ट्र शासनाने गोमातेला ‘राज्‍यमाता’ म्‍हणून दर्जा दिला आहे. शासनाच्‍या या महत्त्वपूर्ण निर्णयामध्‍ये ‘गोमाता’ म्‍हणजे ‘जर्सी प्राणी’ नव्‍हेत, तर भारतातील ‘देशी’ गायी अपेक्षित आहेत. त्‍यामुळे राज्‍यशासनानेही ‘जर्सी’ प्राण्‍यांसाठी नव्‍हे, तर भारतातील देशी गायींच्‍याच पालन-पोषणासाठी अनुदान घोषित केले आहे. मुंबईत मात्र मंदिरांच्‍या बाहेर गोग्रासासाठी ‘देशी’ गायींऐवजी गोमातेप्रमाणे दिसणारे ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल केली जात आहे. हिंदूंही ‘जर्सी प्राण्‍यांनाच गोमाता समजून गोग्रास देत आहेत.

१. चर्नीरोड येथील कृष्‍ण बाग या प्राचीन मंदिरांच्‍या बाहेर ‘गाय’ म्‍हणून ६ जर्सी प्राणी बांधण्‍यात आले होते. या मंदिरात येणारे भाविक गोमाता समजून जर्सी प्राण्‍यांना गोग्रास देत होते. मुंबईत बहुतांश मंदिरांच्‍या बाहेर ही स्‍थिती दिसून येत आहे.

२. महाराष्‍ट्रात मराठवाड्यात ‘देवणी’ आणि ‘लालकंधारी’, पश्‍चिम महाराष्ट्रात ‘खिल्लार’, उत्तर महाराष्ट्रात ‘डांगी’, तर विदर्भामध्‍ये ‘गवळाऊ’ प्रकारच्या देशी गायी आढळतात. या देशी गायींचे दूध पौष्‍टिक असल्‍यामुळे ‘पूर्णअन्न’ समजले जाते, तसेच आध्‍यात्मिकदृष्‍ट्याही भारतातील देशी गायींचे महत्त्व असल्‍यामुळे त्‍यांनाच गोमाता म्‍हटले जाते.

३. जर्सी प्राण्‍यांना ‘गोमाता’ म्‍हटले जात नाही. सद्य:स्‍थितीत अनेकांना याविषयी माहिती नसल्‍याचा गैरफायदा उठवून पैसे कमवणारे लोक गोमातेऐवजी जर्सी प्राण्‍यांना मंदिरांबाहेर बांधत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, हे तुम्‍हाला ठाऊक आहे का ?