सरकारने ‘ॲट्रॉसिटी’ कायदा रहित करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, करणी सेना, महाराष्ट्र राज्य

श्री. सेंगर पुढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जातीजातींमध्ये फूट पडली आहे. सरकार एकीकडे ‘जातीयवाद निर्माण करू नका’, असे आवाहन करते आणि दुसरीकडे ठराविक जातींसाठी वेगळे कायदे बनवते.

पेंटाग्राफमधील ‘स्पार्क’मुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत !

पावसाच्या हलक्या सरींमुळे हार्बर मार्गावर पेंटाग्राफमध्ये ‘स्पार्क’ झाल्याने २४ मे या दिवशी सकाळी लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !

महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे

प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !

मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे परिवहन आयुक्तांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १८ मे या दिवशी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने चौकशी करावी ! – कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना

कॉन्व्हेंट शाळांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? किमान सध्याच्या केंद्र सरकारने तरी धर्मांतराची केंद्रे असणार्‍या कॉन्व्हेंट शाळांची चौकशी करायला हवी !

महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे आयुक्त मराठी भाषेचा उपयोग करत नसल्याच्या मराठी भाषा विभागाकडे तक्रारी !

ही आहे मराठी भाषेची दुर्दशा ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारकच करायला हवे ! संस्कृत भाषेनंतर सात्त्विक असणार्‍या मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन तिला सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे !

महाराष्ट्रात आयात कोळसा वापरण्यास प्रारंभ

विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा या पार्श्वभूमीवर आयात कोळसा वापरण्याविषयी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर चालू केला आहे.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.