मुंबईमध्ये श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री !

हिंदूंनो, श्री लक्ष्मीदेवीचा अवमान होऊ नये, यासाठी वेळीच संघटित होऊन अशा प्रकारच्या फटाक्यांना वैध मार्गाने विरोध करा !

गीता आणि श्रीकृष्ण यांचा अपमान करणारे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना अटक करा ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

दीर्घयुगे, दीर्घ कालखंड उलटून, तसेच दीर्घ युगांचे धक्के पचवूनही हिंदु धर्माची अस्मिता असलेल्या आणि आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी गीतेमधून ..

नवी मुंबई येथून १ कोटी २९ लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त !

यामध्ये ३७ लाख रुपयांच्या खाद्यतेलासह इतर मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी ४ व्यापार्‍यांवर कारवाई केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कोकण विभागागीय सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा !

पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

मुंबई येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या !

मृताच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून ‘माझ्या मृत्यूस कुणीही उत्तरदायी नसून कुणाचीही चौकशी करू नये’, असे लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती !

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतांना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तसेच या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणूक केली होती.

फटाक्यांच्या चाचणीच्या अहवालानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची सूचना देऊ !

फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. १२५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे युवा महोत्सवात सीतेच्या तोंडी ‘लावणी’ घातल्याने अभाविपने सादरीकरण बंद पाडले !

हिंदूंच्या देवतांचे विडंबन होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ सादरीकरण बंद करणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

मुंबई येथे ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त !

सणासुदीच्या काळात जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचे सोडून त्यात भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

खासगी ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ तिकीटदरांवर कुणाचेच नियंत्रण नाही !

एस्.टी. गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारण्याच्या शासनाच्या आदेशाला फाटा देऊन ‘ऑनलाईन’द्वारे खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटे दुप्पट ते तिप्पट दरांनी विकली जात आहेत; परंतु ‘हे भरमसाठ ‘ऑनलाईन’  तिकिटाचे दर आकारणार्‍यांवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत येत नाही’, असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.