मुंबई येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या !

पारस पोरवाल

मुंबई – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी सकाळी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारली. ते भायखळा येथे रहात होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नाहीत. दक्षिण मुंबईत त्यांनी अनेक गृहप्रकल्प उभारले. मृताच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून ‘माझ्या मृत्यूस कुणीही उत्तरदायी नसून कुणाचीही चौकशी करू नये’, असे लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.