मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा !

मुंबई – पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ७ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यात अडीच सहस्र रुपये जमा होणार आहेत.