नवी मुंबई येथून १ कोटी २९ लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई

ठाणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – नवी मुंबई येथील वाशी, तुर्भे आणि बेलापूर रोड या ४ ठिकाणी ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींत अंदाजे १ कोटी २९ लाखांच्या खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये ३७ लाख रुपयांच्या खाद्यतेलासह इतर मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी ४ व्यापार्‍यांवर कारवाई केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कोकण विभागागीय सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची, अन्न पदार्थांचा दर्जा, तसेच गुणवत्ता घसरण्याची भीती अधिक असते. दिवाळीच्या सणात जनतेला भेसळमुक्त सकस आणि चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.