खासगी ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ तिकीटदरांवर कुणाचेच नियंत्रण नाही !

एस्.टी. गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारण्याच्या शासनाच्या आदेशाला फाटा देऊन ‘ऑनलाईन’द्वारे खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटे दुप्पट ते तिप्पट दरांनी विकली जात आहेत; परंतु ‘हे भरमसाठ ‘ऑनलाईन’  तिकिटाचे दर आकारणार्‍यांवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत येत नाही’, असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईत ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची धमकी !

अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, सहारा हॉटेल, तसेच जुहू पी.व्ही.आर्. अशा ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची अज्ञाताने धमकी दिली.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाटाण्याच्या अक्षता !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ ! भरमसाठ तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !

तिकीट बुकींग केंद्रांवर शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा !

‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार !

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेत आहोत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘पिझ्झा हट’ आदी दुकानांच्या बाहेर आंदोलन !

मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारखी नामवंत आस्थापने यांच्या दुकानांमध्ये ‘हलाल’ नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा मुसलमानेतर समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकत आहेत.

अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाकडून धमकी !

दोषीवर कारवाई करण्याचे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचे आश्वासन !

धारावीचा पुनर्विकास झाल्यासच मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल ! – एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

‘गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. प्रतिदिन साधारणतः २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. एका घंट्याला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली आहे’, असेही श्रीनिवास म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.

१५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.