मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणाचे मुख्य कारस्थानी अद्यापही सुरक्षित !

मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे सडेतोड प्रतिपादन !

राज्यातील रेल्वेस्थानकांवरील कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद !

बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ?

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केली आहेत. ‘निवडणूक आयोगाला अशा प्रकारची कोणतीही प्रतिज्ञापत्रे लागत नाहीत, तसेच एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत.

‘मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू ! – विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई

मोहम्मद आणि त्याची पत्नी या नवजात बालिकेची विक्री करणार होते. ‘यामागे मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !

ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती.

राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त आमदारांना ८० लाखांची भेट !

राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

मुंबईतील व्यापार्‍याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !

मुंबई येथील एका व्यावसायिकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील गाभार्‍यात चांदीचा पत्रा असलेल्या भिंतीवर सोन्याचा पत्रा बसवण्यात येत आहे. यासाठी २३० किलो सोने वापरण्यात आले आहे. या सोन्याच्या पत्र्यावर भगवान शंकराचे प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हे कोरण्यात आली आहेत.

‘व्हॉट्स ॲप’ची जगभरातील सेवा २ घंटे ठप्प !

‘व्हॉट्स ॲप’ची सेवा अचानकपणे खंडित झाल्यामुळे वापरकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काहींचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने हानी झाली, तर काहींचे महत्त्वाचे निरोप पोचू न शकल्याने अडचणी आल्या.

काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास नकार देणार्‍या तरुणाची ३ अल्पवयिनांकडून हत्या !

संवेदनशीलता संपत चालल्याने मुलांमध्ये हिंसकता वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना !

ऐन दिवाळीतही मोटार वाहन (परिवहन) विभागाच्या ‘ऑनलाईन’ तक्रारीची ‘लिंक’ आणि ‘अ‍ॅप’ नादुरुस्तच !

मोटार वाहन (परिवहन) विभाग प्रवाशांच्या हितासाठी कि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या लाभासाठी ?