बेंगळुरू (कर्नाटक) – देशात बनावट कागदपत्रांसह रहाणार्या पाकिस्तानी नागरिकांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परवेझ याला बेंगुळरू जिल्ह्यातील जिगणी येथून अटक करण्यात आली आहे. अटक झालेले पाकिस्तानी मुसलमान परवेझच्या संपर्कात होते आणि त्याच्या सूचनेनुसार भारतात काम करत होते. परवेझच यानेच पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय कागदपत्रे सिद्ध करून दिली होती. तसेच युनूस आल्गोर या कट्टर धार्मिक प्रमुखाच्या प्रवचनांचा प्रचारक म्हणूनही तो कार्यरत होता.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |