दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.

आरोपी सचिन वाझे यांच्याकडून कारागृहात असभ्य वर्तन !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड त्याच उद्देशाने वापरला जाणार का ? याविषयी साशंकता !

बेलापूर येथील सेक्टर २३ मधील एका तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड ई-निविदा आणि ई-लिलाव पद्धतीने त्यांनी विक्रीस काढला आहे.

विधानसभेच्या अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी !

विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांना एकूण ६६ सहस्र ५३० इतकी मते मिळाली.

मुंबई महानगरपालिकेच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याला अटक !

मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली. अंधेरी (पूर्व) येथील एका खासगी आस्थापनातील पत्र्याची शेड तोडू नये, यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील २९ साक्षीदारांना एन्.आय.ए. न्यायालयाने फितूर घोषित केले !

साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.

मुंबईत पदपथावरून १ वर्षाच्या मुलीला पळवणारी महिला गजाआड

सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणावरून तिचे छायाचित्र काही लोकांना दाखवल्यावर त्यांनी या महिलेला ओळखले होते. भ्रमणभाषच्या स्थानावरून ती तेलंगाणाहून सोलापूर येथे येत असल्याचे कळले. सोलापूर येथे आल्यावर पोलिसांनी तिला लगेच अटक केली.

बाणगंगेच्या महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ! – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट

काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.

मुंबईत मराठी पाटी नसणार्‍यांना दुकानांवरील कारवाईला स्थगिती !

मुंबई महानगरपालिकेकडून सर्व दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठी भाषेत असणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाविषयी ‘फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने सर्वाेच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ४ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी झाली.