मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हॅलोवीन’ या पाश्‍चात्त्य कार्यक्रमाचे आयोजन !

पाश्‍चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्‍चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे !

कोकणात ८१० चक्रीवादळ निवारा केंद्रांना सरकारची संमती !

प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले !

महिलांनी कपाळाला कुंकू लावणे ही हिंदु धर्माची शिकवण ! – अजय सिंह सेंगर, करणी सेनाप्रमुख, महाराष्ट्र

अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु महिलांनी कपाळाला कुंकू लावायला हवे’, अशी भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त केली.

मुंबई येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी !

महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी देण्यात आली आहे. याविषयी धमकीचा दूरभाष ३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उल्हासनगर येथून आला होता.

…तर रस्त्यावर उतरून हलाल परिषदेला तीव्र विरोध करावा लागेल ! – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या संघटनेकडून मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपी, तसेच उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांंची हत्या करणारे यांचा खटला लढवण्यासाठी अर्थपुरवठा केला गेला आहे.

ऋषि सुनक हिंदु असले, तरी त्यांचे हृदय आणि मेंदू ब्रिटीश आहे !

विदेशात भारतीय वंशांचे लोक मोठ्या पदावर पोचली की, भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र या व्यक्ती भारतासाठी काही करण्याऐवजी ते रहात असलेल्या देशासाठीच प्रमाणिकपणे काम करतात, हेच यातून स्पष्ट होते !

केंद्रशासनाकडून महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींच्या २२५ प्रकल्पांना संमती !

केंद्रशासनाने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प संमत केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधानांनी वरील माहिती दिली.

‘मुंबई’ असे नामांतर होऊनही कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ !

वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबे’ शहराचे नामांतर ‘मुंबई’ असे करण्यात येऊनही आजही येथील उच्च न्यायालयाचा कागदोपत्री उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ असाच करण्यात येत आहे.

९ नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल

मुंबईतील विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर निकाल दिला जाणार आहे.

७ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील बाणगंगा येथे होणार महाआरती !

मुंबईतील काशी म्हणून ओळख असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या (७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी उपस्थित रहाणार आहेत.