मुंबई – मुंबई महानगरपालिकेकडून सर्व दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठी भाषेत असणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाविषयी ‘फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने सर्वाेच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ४ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पुढील सुनावणी १८ डिसेंबर या दिवशी ठेवली आहे. यामुळे या सुनावणीनंतर पुढील धोरण ठरणार आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असण्याविषयी राज्यशासनाने १७ मार्च या दिवशी शासन आदेश काढला आहे. त्यांनतर मुंबई महानगरपालिकेने याविषयी परिपत्रक काढले.