स्वातंत्र्यसैनिकांना दरमास २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम या लढ्यात सहभागी सैनिकांना दरमहा २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

१ लाख युवकांना रोजगार देण्यासाठी राज्यशासनाचे विविध आस्थापनांसमवेत सामंजस्य करार !

१६ नोव्हेंबर या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास अन् रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांविषयी राज्य महिला आयोगाचे मौन !

श्रद्धा वालकर हिच्या देहाचे तुकड करणारा ‘आफताब’ आणि बुरखा घालत नाही; म्हणून भररस्त्यात रूपाली चंदनशिवे हिचा गळा चिरणारा ‘इक्बाल शेख’ या प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’ स्पष्ट होत आहे.

प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

पाळीव श्वानांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकांना दंड !

मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (घनकचरा) चंदा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळीव श्वान फिरवणार्‍यांना आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे; कारण पाळीव श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केली, तर त्या श्वानाच्या मालकाकडून दंड आकारण्यात येणार आहे.

लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता वास्तविक जनतेला अशी मागणी करावी लागू नये. सरकारी पातळीवरून स्वतःहून हा प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे !

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतांनाचा पुतळा उभारणार ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांद्वारे खानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याविषयी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे.

अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाची धाड !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील विविध ६ शहरांतील एकूण ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडी वाराणसी, कानपूर, देहली, कोलकाता आणि लक्ष्मणपुरी या शहरांत टाकण्यात आल्या.

मुंबई विमानतळावर तस्करीचे ३२ कोटी रुपयांचे सोने पकडले !

मुंबई विमानतळावर २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तस्करी करण्यात येत असलेले ३२ कोटी रुपयांचे ६१ किलो सोने सीमा शुल्क विभागाने पकडले. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.