अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाची धाड !

अबू आझमी

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील विविध ६ शहरांतील एकूण ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडी वाराणसी, कानपूर, देहली, कोलकाता आणि लक्ष्मणपुरी या शहरांत टाकण्यात आल्या.
मुंबईतील कुलाबा येथील कमल मॅन्शनमधील आझमी यांच्या कार्यालयावरही धाड टाकण्यात आली. कोलकाता कार्यालयाच्या ऑपरेटरचा वापर हवाला मार्गाने पैशांचा व्यवहार करण्यासाठी केल्याचा संशय प्राप्तीकर विभागाने व्यक्त केला आहे. अबू आझमी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांचे सचिव असलेल्या आभा गुप्ता यांच्या मालमत्तेवरही प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे.