‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमात टिकली लावण्याला वेडेपणा ठरवले !

हिंदु धर्मशास्त्राला वेडसरपणा ठरवणार्‍या ‘झी मराठी’ वाहिनीने समस्त हिंदूंची क्षमा मागावी. असे न केल्यास हिंदूंनी अशा वाहिन्यांवर बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

नाहक अटकेमुळे न्यायव्यवस्थेवर भार ! – उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

सध्या दिवाणी वादांना फौजदारी खटल्यांचा रंग दिला जात आहे आणि विनाकारण अटक करून न्यायालयीन व्यवस्थेवरील भार वाढवला जात आहे, असे मत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.

१५ वर्षांनंतर प्रथमच चिकन आणि मासे यांच्या नमुन्यांची पडताळणी करणार !

अन्न आणि औषध प्रशासनाकडून १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यातील विक्रेत्यांकडील चिकन अन् मासे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याविषयी आदेश काढले.

प.पू. अच्युतानंद महाराज (भाऊ बिडवई) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल येथे भजन आणि भंडारा यांचे आयोजन !

या वेळी प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश, प.पू. रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज यांच्या छायाचित्रांसमोर नैवेद्य दाखवला. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, ही आरती करण्यात आली. यानंतर भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले.

गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यपालांनी पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आली आहे’, असेही पवार म्हणाले.

वर्ष २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल ! – गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी उद्योग समूह

गौतम अदानी म्हणाले, ‘‘वर्ष २०५० पर्यंत भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. एकेकाळी वसाहतवाद्यांनी चिरडलेेला भारत देश आज लक्षणीय विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

‘आंतरधर्मीय विवाह झालेल्या युवती सुखरूप आहेत ना ?’ याची माहिती घ्या ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बालकल्याण मंत्री

वसई येथील श्रद्धा वालकर या हिंदु युवतीसमवेत देहली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहून आफताब पुनावाला याने तिची निर्घृण हत्या केली. समाजाला हादरवणार्‍या या घटनेमुळे राज्यशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लोकलच्या प्रवासात युवतीने ‘टिकली’चे महत्त्व अधोरेखित करून दिला संदेश !

‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती तर ‘श्रद्धा’ आज ‘टिकली’ असती.!, अशा आशयाचे मार्मिक पत्रक हाती घेतलेल्या एका युवतीने लोकलगाडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘सगळे अब्दुल हे सारख्याच मनोवृत्तीचे असतात. अशा जिहाद्यांना बॉयकॉट करा’…