पाळीव श्वानांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकांना दंड !

मुंबई महापालिकेचा निर्णय !

मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (घनकचरा) चंदा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळीव श्वान फिरवणार्‍यांना आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे; कारण पाळीव श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केली, तर त्या श्वानाच्या मालकाकडून दंड आकारण्यात येणार आहे. श्वानाने अस्वच्छता पसरवतांना पकडल्यास मुंबई महानगरपालिका मालकाकडून ५०० रुपये दंड वसूल करणार आहे. त्याचा प्रारंभ मुंबईतील कुलाबा येथून होणार आहे. सर्व २४ वार्डांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. यासाठी लवकरच ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती करून सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणार्‍या पाळीव श्वानांवर कारवाई करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे.