सीमा शुल्क न भरल्यामुळे शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर रोखले !

सीमा शुल्क न भरल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी रोखले. १ घंटा पडताळणी करून, तसेच सीमा शुल्काचे ६ लाख ८३ सहस्र रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

नवी मुंबई येथे ३ लाखांची लाच मागणारी महिला तहसीलदार पोलिसांच्या कह्यात !

महिलाही भ्रष्टाचारात पुढे असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

मुंबईमध्ये १५ नोव्हेंबर या दिवशी पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा !

हिंदु सभेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी दादर (पश्चिम) येथील पाटील मारुति मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर ‘भारताच्या फाळणीचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या ‘क्लस्टर एस्.टी.पी.’ प्रकल्पाविषयी समन्वयाने नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा, तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील.

हिंदु समाज धर्मांतरासाठी कधीही कुणावर बळजोरी करत नाही ! – आमदार नीतेश राणे, भाजप

एखाद्या हिंदु युवकाने मुसलमान युवतीशी लग्न केल्यावर धर्मांतरासाठी तिच्यावर बळजोरी केल्याचे एकतरी उदाहरण अबू आझमी यांनी दाखवावे.

२५ सहस्र उद्योजक घडवण्याचे शासनाचे उद्दिष्ट ! – उद्योगमंत्री उदय सामंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी वर्ष २०२२ ते २०२३ साठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अन्वेषण यंत्रणांद्वारे विरोधकांवर होणार्‍या कारवाईचे सूत्र संसदीय समितीपुढे उपस्थित करणार ! – खासदार संजय राऊत

मागील काही वर्षांत विरोधकांवर अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांसारख्या केंद्रीय यंत्रणांद्वारे  कारवाई केली जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे सूत्र संसदीय समितीपुढे उपस्थित करणार आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ‘..

‘२६/११’ पूर्वी हलाल प्रमाणपत्र बंद करा, अन्यथा ‘त्रिशूल प्रमाणपत्र’ वितरित करू !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये हुतात्मा झालेले सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली वहातो. त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल, तर येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी

राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे.

विशाळगड, शिवडी यांसह अन्य गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हे हिंदुत्वनिष्ठ शासन करेल ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्याने भाजपकडून मुंबईत जल्लोष