शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबई – शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला. एप्रिल २०२० पासून ते अटकेत होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत यावे, यासाठी जामिनाला एक आठवड्याची स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) न्यायालयात केली. ती न्यायालयाने मान्य करून तेलतुंबडे यांना जामीन देण्याच्या निर्णयाला एक आठवड्याची स्थगिती दिली आहे.

सौजन्य : TV9 Marathi

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपिठाने तेलतुंबडे यांनी नियमित जामिनासाठी केलेली याचिका योग्य ठरवली, तसेच रोख रक्कम देऊन जामिनावर सुटका करण्याची तेलतुंबडे यांचे अधिवक्ता मिहीर देसाई यांनी केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली. तेलतुंबडे हे २१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक होते.