प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतांनाचा पुतळा उभारणार ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांद्वारे खानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याविषयी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे. आजही हा प्रसंग कोट्यवधींना प्रेरित करत आहे. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्याच्या प्रसंगाचा पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

असा पुतळा उभारण्याविषयी, तसेच ‘लाईट अँड साऊंड’ कार्यक्रम करण्यासाठी ‘हिंदु एकता आंदोलन, सातारा’ आणि अन्य संघटना यांनी केलेल्या विनंतीनुसार याविषयीचा प्रस्ताव मागवण्यात यावा, असा आदेश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला.