शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या भाषणाच्‍या जुन्‍या ध्‍वनीफितींच्‍या संदर्भात राज ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्‍या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्‍यांनी ग्रामोफोनमध्‍ये ध्‍वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.

ऐरोली (नवी मुंबई) येथे धाड टाकल्‍याचे नाटक करून लुटणार्‍या टोळीला पकडले !

१२ लाख ७५ सहस्र रुपयांची रोख रक्‍कम, १ पिस्‍तूल, ६ काडतुसे, तसेच सियाझ आणि बलोनो गाडी पोलिसांनी जप्‍त केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्‍ही चित्रणाच्‍या आधारे वाहनाच्‍या क्रमांकावरून आरोपींना शोधले.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८० टक्‍के भरले !

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ८० टक्‍के क्षमतेने भरलेले आहेत. अप्‍पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्‍य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा ७ तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.

गांधीजींच्‍या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्‍याचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश !

‘महापुरुषांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये केल्‍याची अनेक प्रकरणे असतांना केवळ संभाजी भिडे यांच्‍या विरोधात जनहित याचिका का ?’ असा प्रश्‍नही या वेळी मुख्‍य न्‍यायमूर्ती देवेंद्र उपाध्‍याय यांनी उपस्‍थित केला.

मुंबई शहराच्‍या प्रवेशद्वारांवरील पथकर नाके तातडीने बंद करा ! – आमदार आदित्‍य ठाकरे

रस्‍ते आणि पूल यांसाठी पथकर लावणार आणि त्‍याच वेळी मुंबई महानगरपाकिलेकडूनही अधिकचा कर वसूल केला जाणार, हा मुंबईकरांवर अन्‍याय आहे. त्‍यांवर कायमस्‍वरूपी तोडगा काढणे आवश्‍यक आहे’, अशी मागणी आदित्‍य ठाकरे यांनी या पत्रामध्‍ये केली आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणजे अक्कल आली असे नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार

भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवात केलेल्या औरंगजेबाच्या उद्दात्तीकरण्याच्या वक्तव्याचा विरोधात डॉ. शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

८ ऑगस्‍टपर्यंत मुंबईमध्‍ये आवश्‍यक बसगाड्या उपलब्‍ध होतील ! – मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री

भाडेतत्त्वावरील १ सहस्र ६७१ बसगाड्यांच्‍या चालकांनी बंद पुकारला आहे. या गाड्यांऐवजी आतापर्यंत एस्.टी. महामंडळ आणि खासगी आस्‍थापने यांकडून १ सहस्र २७१ गाड्या आम्‍ही उपलब्‍ध केल्‍या आहेत. उर्वरित ४०० गाड्या ८ ऑगस्‍टच्‍या सायंकाळपर्यंत उपलब्‍ध होतील

वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त !

नव्‍याने बांधलेल्‍या वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त झाले. त्‍यांनी महामार्ग प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांना खडसावत संबंधित ठेकेदाराला काळ्‍या सूचीत टाकण्‍याचे आदेश दिले आहेत.

निवृत्त सरकारी अधिकार्‍याच्‍या घरात खोटी धाड !

६ तोतया सीबीआय अधिकार्‍यांनी निवृत्त सरकारी अधिकार्‍याच्‍या घरावर धाड टाकल्‍याचे नाटक करून पैसे आणि दागिने, भ्रमणभाष, घड्याळे आदी ३६ लाख रुपयांचा माल कह्यात घेतला.

वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !

मुंबई शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्‍टच्‍या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्‍यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.