मुंबई – शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग काही मासांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम्.एम्.आर्.डी.)कडून देखभालीसाठी स्वत:कडे घेतले आहेत. या महामार्गांवरील पथकर नाके तातडीने बंद करावेत, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ७ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
मुंबईकरांच्या कराच्या पैशांतून या रस्त्यांची देखभाल होते. मग MSRDC तिथे अजूनही टोल का आकारते?मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी? – आदित्य ठाकरेhttps://t.co/G7UIYYwCIs < येथे वाचा सविस्तर वृत्त#MaharashtraPolitics #Mumbai #Toll #AdityaThackeray #Update @AUThackeray pic.twitter.com/1f3No6SVT0
— LoksattaLive (@LoksattaLive) August 7, 2023
याविषयी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे. ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि पूल यांसाठी पथकर लावणार आणि त्याच वेळी मुंबई महानगरपाकिलेकडूनही अधिकचा कर वसूल केला जाणार, हा मुंबईकरांवर अन्याय आहे. जे पथकर नाके २० वर्षांहून अधिककाळ कार्यरत आहेत, त्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे’, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्रामध्ये केली आहे.