मुंबई – नव्याने बांधलेल्या वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्याने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्त झाले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना खडसावत संबंधित ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ६८ ठिकाणी सळया बाहेर आल्या आहेत. (अशाने एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)