ऐरोली (नवी मुंबई) येथे धाड टाकल्‍याचे नाटक करून लुटणार्‍या टोळीला पकडले !

टोळीतील ११ आरोपींना रबाळे पोलिसांनी पकडले आहे

ऐरोली (नवी मुंबई) – येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकार्‍याच्‍या घरातील रोख रकमेसह दागिने असा सुमारे ३५ लाखांचा ऐवज धाड टाकल्‍याचे नाटक करून आठवडाभरापूर्वी लुटून नेण्‍यात आला होता. या टोळीतील ११ आरोपींना रबाळे पोलिसांनी पकडले आहे. १२ लाख ७५ सहस्र रुपयांची रोख रक्‍कम, १ पिस्‍तूल, ६ काडतुसे, तसेच सियाझ आणि बलोनो गाडी पोलिसांनी जप्‍त केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्‍ही चित्रणाच्‍या आधारे वाहनाच्‍या क्रमांकावरून आरोपींना शोधले.