Failure Of Copy-Free Campaign : जालना येथे २ परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने तरुणांनी कॉपी पुरवली !

कॉपी रोखण्यासाठी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ‘भरारी पथके’ नेमण्यात आलेली असतांना जालना येथे ही पथके काय करत होती ? पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे हे लक्षण !

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड !

मुख्यमंत्री सचिवलयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी, तसेच शिक्के असल्याचे सचिवालयाला निदर्शनास आले आहे.

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

संत बाळूमामा मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी बाळूमामांच्या भक्तांचा २७ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. 

लातूर विभागात कॉपी करणार्‍या १४ विद्यार्थ्यांवर कारवाई !

इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला लातूर विभागीय शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या ७ भरारी पथकांनी केलेल्या निरीक्षणात १४ विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आले. यात लातूर येथील ५ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी करणार्‍या ५८ विद्यार्थ्यांवर कारवाई !

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी केल्याचे ५८ प्रकार उघडकीस आले आहेत.

महाबळेश्वर येथील डान्सबारवर पोलिसांची धाड !

सातारा येथे वारंवार डान्सबारवर धाडी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीही अश्लील नृत्याचे प्रकार चालूच आहेत. पोलीस कठोर कारवाई करत नसल्याचे हे निर्देशक आहे.

‘नवनीत’च्या प्रश्नसंचाच्या छायांकित प्रती विकणार्‍या तिघांना अटक !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खरे असतील, तर याची सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन डान्सबार बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

गोवा : संरक्षित स्मारकांचे अनुमतीविना चित्रीकरण केल्यास ५० सहस्र रुपये दंड

संरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ?

Casino In Jatrotsav : इब्रामपूर (गोवा) येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करणार्‍यांची नावे मंदिर समितीने फलकावर लावली !

जुगाराला समर्थन असणार्‍या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्‍या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !