एस्.टी.च्या खासगीकरणाच्या पर्यायांविषयी अभ्यास चालू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हाही एक पर्याय आहे; मात्र याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. अन्य राज्यांमधील परिवहन मंडळांचा अभ्यास करून आपण आपल्या राज्यांविषयीचा निर्णय घेऊ.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले !

देशभरातील कानाकोपर्‍यांतून श्री विठ्ठलाचे भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येतात. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकर्‍यांना कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येता आले नाही.

मराठवाडा येथे एस्.टी.च्या संपाचा तिढा कायम, कर्मचारी भूमिकेवर ठाम !

एस्.टी. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचार्‍यांचा संप अजूनही चालूच आहे. मराठवाड्यातही हे आंदोलन तीव्र होत असून ३९५ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

एस्.टी. महामंडळाने राज्यात ९१८, तर पुणे जिल्ह्यात २६ कर्मचारी निलंबित केले !

राज्यात १२० पेक्षा अधिक एस्.टी. डेपोमध्ये संप चालू असल्याने एस्.टी.ला प्रतिदिन जवळपास कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पाला निधीचा फटका !

कोणताही सारासार विचार न करता केवळ श्रेय मिळवण्यासाठी केलेला राजकीय पक्षांचा हा खटाटोप आहे का, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहनांची सोय !

प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाशांसाठी २४ घंटे हेल्पलाईन चालू करण्यात आली असून प्रवाशांनी ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

एस्.टी. महामंडळाकडून संप मागे घेण्याचे कर्मचार्‍यांना निवेदनाद्वारे आवाहन !

सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. याविषयी महामंडळाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.

‘लाल परी’ रुसली !

महामंडळाला तोटा होऊ लागला, तेव्हापासूनच सावध होऊन ठोस उपाययोजना काढून त्याला वर काढले असते, तर आज ही वेळ आली नसती. सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या वाहतूक यंत्रणेची जोपासना झाली असती, तर ही वेळ आली नसती.

एस्.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या न करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन !

मी आत्महत्या करणार्‍यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना केले.

संप चिघळण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न ! – अनिल परब, परिवहनमंत्री

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप चिघळावा, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला असून ‘संप मागे घ्यावा’, असे आवाहनही केले आहे.