इंधनाअभावी एस्.टी.चा वेग मंदावला

इंधनासाठी पैसे पाठवू न शकल्यामुळे जिल्ह्यांतील सर्वच आगारातील डिझेल संपले आहे. परिणामी इंधनाअभावी जिल्ह्यातील एस्.टी.बसगाड्यांचा वेग मंदावला आहे.

महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य; परंतु कर्नाटकच्या बसगाड्यांचा महाराष्ट्रात मुक्त वावर

कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्‍या चालवल्या आहेत.

एस्.टी.ची सेवा अधिक सक्षम करणार !  – अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

कुडाळ शहरातील गांधी चौक येथे एस्.टी.च्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगार अव्वल : दिवाळी प्रवासी हंगामात ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न !

दिवाळीचा हंगाम यंदा इचलकरंजी आगाराला अनुकूल ठरला आहे. दिवाळीच्या प्रवासी हंगामात आगाराला ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळातही मिळालेल्या या उत्पन्नामुळे इचलकरंजी आगार कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.