सोलापूर येथील एस्.टी. कर्मचार्याने नातेवाईकांना भेटण्यासाठी मद्याच्या नशेत पळवली एस्.टी. बस !
एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू असल्यामुळे सर्व बसगाड्या बंद आहेत. घडलेला हा प्रकार अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित बसचा शोध चालू केला आणि पोलिसांच्या साहाय्याने चालकाला तेलगाव येथे पकडले.
एस्.टी.च्या संपावर लवकरच तोडगा निघेल ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
राऊत पुढे म्हणाले की, परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांविषयी सर्वांना सहानुभूती आहे. या संपाला राजकीय वळण लागले आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे परिवहन महामंडळाचे कर्मचारी नव्हते.
(म्हणे), ‘एस्.टी. कर्मचार्यांच्या वेतनवाढीची सार्वजनिक चर्चा करणे योग्य नाही !’ – अनिल परब, परिवहनमंत्री
जर पूर्ण करणे शक्य नव्हते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतःच्या घोषणापत्रात वेतनाविषयी आश्वासन का दिले ? त्यामुळे केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी घोषणा केली होती का ?
संपकरी एस्.टी. कर्मचारी हिंसाचार करत असतील, तर राज्यशासनाला कारवाईचा अधिकार ! – मुंबई उच्च न्यायालय
एस्.टी. कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी राज्यशासनाने न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले.
भाजपचे सरकार असतांनाही एस्.टी.चे विलीनीकरण झाले नव्हते ! – महादेव जानकर, नेते, भाजप
रस्त्यावर असतांना एक बोलावे लागते आणि आत गेल्यावर एक असते. त्यामुळे हा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे, हाच त्यावरचा एक पर्याय आहे. भाजप सरकारच्या काळातही एस्.टी.चे विलीनीकरण झाले नव्हते.
कोल्हापुरात ‘टी.ई.टी.’च्या काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ; विलंबाने आलेल्यांना प्रवेश नाकारला !
एस्.टी.’च्या संपामुळे काही ‘टी.ई.टी.’‘परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी नियोजित वेळेत पोचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी-पालक आणि परीक्षा केंद्रावरील अधिकारी यांच्यात हमरी-तुमरी झाली.
एस्.टी. कर्मचार्यांच्या संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक !
संप करणार्या कर्मचार्यांनी आक्रमक होऊन अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढण्याची चेतावणी दिली होती. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. मोर्चा काढणार्या कर्मचार्यांना आझाद मैदानावरच अडवण्यात आले.
एस्.टी. कर्मचार्यांच्या विलीनीकरणासाठी पर्याय सुचवला आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते
एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाचे प्रकरण
एस्.टी.च्या भरतीतील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना सेवेत घेण्याची शक्यता !
राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्यांचा संप मोडीत काढण्यासाठी रोजंदारीवर काम करणार्याना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. उर्वरित कर्मचारी कामावर न आल्यास नवीन कामगारांना कामावर घेण्याचे संकेत परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.