मुंबई – सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. याविषयी महामंडळाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, महामंडळाचा संचित तोटा १२ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. संपामुळे प्रतिदिन १५ ते २० कोटी रुपयांची हानी होत आहे. याचा परिणाम महामंडळ आणि परिणामी कर्मचारी यांना सहन करावा लागणार आहे. मागील १८ मासांचे वेतन महामंडळाने दिले आहे. त्यासाठी राज्यशासनाकडून आतापर्यंत ३ सहस्र ५४९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापुढेही सर्व कर्मचार्यांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रयत्न केला जाईल. शासकीय कर्मचार्यांप्रमाणे महागाई भत्ता २८ टक्के आणि घरभाडे भत्ता (८,१६,२४ टक्के) असे देण्याचे मान्य केले आहे. तसेच दिवाळी भेटही कर्मचार्यांना दिली आहे. प्रशासनाने निवेदन प्रसिद्ध केले असले, तरी अद्यापपर्यंत संप करणार्या २ सहस्रांहून अधिक कर्मचार्यांना निलंबित केले आहे.