श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणारे श्रीमंत छत्रपती शाहू यांनी त्यांच्याकडे ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांच्या उमेदवारी आवेदनपत्रात घोषित केले आहे. यात प्रामुख्याने १४७ कोटी ६४ लाख ४९ सहस्र रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ सहस्र रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्याकडे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. छत्रपती शाहू यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी ३७ लाख २८ सहस्र ३९८ रुपयांची संपत्ती आहे.