पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !

पंढरपूर – लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरीवर नारळ फोडत त्यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ केला. (हिंदु धर्म आणि देवता यांचा सातत्याने अपमान करणार्‍यांना निवडणूक आली की देव आठवतो. – संपादक) प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. त्यापूर्वी मतदारसंघातील ७ मंदिरांत नारळ फोडण्यात येणार असून त्याचा प्रारंभ श्री विठ्ठल मंदिरापासून करण्यात आला असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.