विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात ८६ सहस्र ३५९ रुपयांचा अवैध साठा जप्त !

पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री या परिसरांत धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, तसेच अवैधरित्या मद्य विक्री करणार्‍यांवर धाडी टाकून ८६ सहस्र ३५९ रुपये किंमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात विभागाच्या वतीने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने १ ते ४ मे या कालावधीत विशेष मोहीम आखून विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ढाब्यांवर धाडी टाकून एकूण ८ गुन्हे नोंदवून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्हयांत एकूण १६ लिटर देशी मद्य, ८ लिटर विदेशी मद्य, १८ लिटर बिअर, तसेच गावठी हातभट्टी दारू २६ लिटर आणि १ सहस्र ८०० लिटर गावठी हातभट्टी मद्य निमिर्तीचे रसायन मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे.