निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाटलीपुत्र (बिहार) शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरिरात चढवले जात आहे बिसलेरीचे पाणी !

शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.

बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.

देशात सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्राला ! – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

पाकमध्ये ख्रिस्ती परिचारिकांना ईशनिंदेच्या प्रकरणी अटक

लाहोर येथे २ ख्रिस्ती परिचारिकांवर ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला एक पवित्र स्टिकर हटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

झारखंडमध्ये गेल्या ११ मासांमध्ये १ सहस्र ६५७ बलात्कार

अशा बलात्कार्‍यांना तात्काळ फासावर चढवायला हवे, तरच या प्रकारच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच जनतेला धर्मशिक्षण देऊन सुशिक्षित करणे आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे, हीच काळाची आवश्यकता आहे !

किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करा !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी