श्री महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे आजपासून प्रत्येक घंट्याला ४०० भाविकांनाच दर्शन !

मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत खुले असून ही सुविधा ‘ऑनलाईन बुकींग’ केलेल्यांनाच मिळणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व !

२१ पैकी ६ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर सिद्ध झालेल्या शिवसेनेच्या विरोधी पॅनेलने सत्ताधार्‍यांना चांगली लढत दिली.

कोल्हापूर येथील साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन !

खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात न बांधण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे अन्न आणि औषध प्रशासनास निवेदन

‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडाचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पहारा मोहीम पार पडली !

विशाळगडासह जवळपास प्रत्येक गडाची ३१ डिसेंबरच्या आसपास अशीच स्थिती असते. ही स्थिती प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही लज्जास्पद आहे !

कोल्हापूर येथील नेहरू विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या ‘संस्कार’ वह्यांचे वाटप !

सनातनच्या ‘संस्कार’ वह्या आणि लघुग्रंथ यांचे वाटप करणार्‍या सौ. मनीषा विनोद वागळे यांचे अभिनंदन ! प्रत्येक जण याप्रकारे धर्मकार्यात हातभार लावू शकतो !

कोरोनाचा नवा ‘व्हेरीयंट ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत राहिलेल्या त्रुटी दूर करून प्रशासनाने गतीने हालचाली कराव्यात – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

नयन हंकारे आणि संतोष सावंत ‘ब्लॅक बेल्ट’चे मानकरी !

‘गेनसेई रियु कराटे दो असोसिएशन’ आणि ‘चाणक्य मार्शलआर्ट्स बहुउद्देशीय संस्थे’चे संतोष श्रावण सावंत याने ‘ब्लॅक बेल्ट शोदान’ आणि नयन प्रदीप हंकारे यांनी ‘ब्लॅक बेल्ट निदान’ या कराटेतील उच्च मानली जाणारी पदवी प्राप्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आमचा वापर केला ! – चंद्रदीप नरके, शिवसेना

महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथे नुकतेच देण्यात आले.

तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद असलेला इचलकरंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडेला अटक : ५ दिवस पोलीस कोठडी

माजी नगरसेवक संजय तेलनाडे हा ‘एस्.टी. सरकार गँग’ नावाच्या टोळीने संघटित गुन्हेगारी करत असे.