कोल्हापूर, ४ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. मनीषा विनोद वागळे यांनी म.शा.गा.गृ. शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालय या ठिकाणी २२ डिसेंबर २०२१ या दिवशी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या ‘संस्कार’ वह्या आणि सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्री गणपति अर्थवशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र’ वाटप केले. याचा लाभ शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल गायकवाड उपस्थित होत्या. (सनातनच्या ‘संस्कार’ वह्या आणि लघुग्रंथ यांचे वाटप करणार्या सौ. मनीषा विनोद वागळे यांचे अभिनंदन ! प्रत्येक जण याप्रकारे धर्मकार्यात हातभार लावू शकतो ! – संपादक)
विशेष
१. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुख्याध्यापिका श्रीमती मंगल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अथर्वशीर्षाचा अर्थ सांगून त्यांच्याकडून अथर्वशीर्षाचे पठण करवून घेतले.
२. वहीवरील मजकूर मुख्याध्यापिका श्रीमती मंगल गायकवाड यांना आवडला आणि ‘अशा प्रकारे प्रबोधन करणार्या वह्यांची विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे’, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.