मोजणी करून लवकरच विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. मोजणी पूर्ण करून लवकरच अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर प्रशासनाकडून कृती करण्याचे आश्वासन !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ११ प्रशासकीय अधिकारी, ३८ शाळा, १२ महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली, तसेच ५५ हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या आणि धर्मप्रेमी महिला यांनी १६ मंदिरांत लावली प्रबोधनपर भित्तीपत्रके !

हिंदूंनी त्यांचे नवीन वर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ मंदिरांमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावली.

राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) धरणाच्या द्वाराचे तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू असतांना द्वार उघडून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग !

धरणातून साधारणत: ४ सहस्र क्युसेक्स विसर्ग चालू होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणेने वेगाने  हालचाल करून धरणाचे द्वार बंद करण्यात यश मिळवले आहे.

विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !

परिक्षांच्या संदर्भात वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल ! – भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची वारंवार हानी होत असेल, तर वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. 

नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच ! – आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही.त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.

हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि परिवार सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा ! – चंद्रकांत बराले, माजी जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर

सनातन संस्थेच्या बंदीविषयी विधानसभेत केली जाणारी मागणी अत्यंत चुकीची आहे. सनातन संस्था हिंदूंना देव, देश आणि धर्म यांची शिकवण देते.

कळंबा कारागृहाच्या वतीने नाताळ खरेदी मेळावा !

निधर्मी शासन प्रणालीत यापेक्षा वेगळी ती अपेक्षा काय ठेवणार ?

तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना एवढा मोठा घोटाळा शक्य नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करायची आणि दुसरीकडे लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळायचे असा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून चालू आहे.’’