कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२.४ फुटांवर !

कोल्हापूर येथील पंचगंगा नदी

कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा अल्प झाल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीची वाढ अल्प गतीने होत आहे. ७ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली. पुराचा संभाव्य धोका पहाता ‘एन्.डी.आर.एफ.’ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथकाने प्रयागचिखली आणि शिरोळ येथे पहाणी केली. कोयना धरणात सध्या २० ‘टी.एम्.सी.’ (क्षमता १०५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा असून सांगली येथील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ७ फूट ६ इंच इतकी नोंदवली गेली.