कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

हिंदु जनजागृती समितीचे हुपरी येथे निवेदन

हुपरी येथे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ४ जुलै (वार्ता.) – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना आणि हुपरी पोलीस ठाणे येथे देण्यात आले.

या प्रसंगी उपनगराध्यक्षा सौ. सुप्रिया पालकर, नगरसेवक श्री. गणेश वाइंगडे, ‘लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थे’चे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, शिवसेनेचे श्री. राजेंद्र पाटील, ‘दुर्गवेध प्रतिष्ठान’चे श्री. महादेव आढावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री सचिन माळी, संभाजी काटकर, शिवाजी शिनगारे, अभिजित घोडेस्वार, ओमराज माळवदे, ‘समस्त हिंदू संघटन’चे सर्वश्री रवींद्र गायकवाड, संग्राम माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडलप्रमुख श्री. रोहन माळी, श्री. ओंकार रावळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुरजित घोरपडे, मराठा समाज युवा शहरप्रमुख श्री. तुषार मालवेकर, श्री. शुभम कांबळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते. निवेदन देऊन झाल्यावर सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करून मृत्यूमुखी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहिली.