अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित !

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले.

विदेशांतील कारागृहांमध्ये ७ सहस्र १३९ भारतीय नागरिक अटकेत

सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.

सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

कळंबा कारागृहातील पोलीस शिपायाकडून बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी

अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !

काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

पुतिन कि नवेलनी ?

राष्ट्रोत्कर्षासाठी सदाचारी, कर्तव्यदक्ष, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रहित जपणारा नेता जनतेला हवा असतो. निवडणुकीच्या आधी उमेदवार विविध प्रकारची आश्‍वासने जनतेला देत असतात; मात्र निवडून आल्यानंतर राजकारण्यांना याचा विसर पडतो.

नागपूर कारागृहातील गुन्हेगारासाठी चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित !

पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !

अधिकार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण माजी आमदार राजू तोडसाम यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा

कार्यालयातील लेखापालास शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने माजी आमदार राजू तोडसाम यांना शिक्षा सुनावली

सरकारचा एक तरी विभाग लाजिरवाणा नाही, असे आहे का ?

कारागृहातील कोरोनाबाधित आणि संशयित बंदीवानांनी मुलींच्या वसतीगृहात असलेल्या ‘कोविड सेंटर’मधील कपाटांचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस करणे, कागदपत्रे आणि पैशांची चोरी करणे, तसेच मुलींच्या कपड्यांवर अश्‍लील लिखाण करणे असे प्रकार केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.