इराकमध्ये २१ आतंकवाद्यांना सामूहिक फाशी

भारतात असे कधी होणार ? भारतात आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तेथे हत्या, बलात्कार आदी गुन्हे करणार्‍यांना कधी फाशी होणार ?

बगदाद (इराक) – इराकने २१ आतंकवाद्यांना फाशीच्या शिक्षेची कारवाई करत त्यांना फासावर लटकवले. इराकच्या नासिरिया कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली.

सैन्य तळावर झालेल्या २ आत्मघाती आक्रमणांच्या प्रकरणी या आतंकवाद्यांना दोषी ठरवण्यात आले होते.